Tripura Polls 2023 news update sarkarnama
मुंबई

Tripura Polls 2023 : भाजपचा विरोधकांना झटका ; निवडणुकीपूर्वीच काँग्रेस, माकपा, 'तृणमूल'चे बडे नेते गळाला

Tripura politics : माकपाचे आमदार मोबोशर अली आणि तृणमूल कॉंग्रेस नेता सुबल भौमिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Tripura politics : त्रिपुरा विधानसभेची (Tripura Polls 2023 )निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपने (bjp) विरोधकांना झटका देण्यास सुरवात केली आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी गळाला लावण्यास सुरवात केली आहे. लवकरच हे नेते दिल्ली येथील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (Tripura Polls 2023 news update)

काँग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते बिलाल मिया यांच्यासह काँग्रेसमधील काही बडे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. माकपाचे आमदार मोबोशर अली आणि तृणमूल कॉंग्रेस नेता सुबल भौमिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सुबल भौमिक यांना काही महिन्यापूर्वी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटविण्यात आले होते.त्यांनी जुलै २०२१ मध्ये तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

२०१८च्या निवडणुकीत माकपाचे आमदार मोबोशर अली हे कैलासहर विधानसभा मतदार संघातून निवडुन आले आहेत. तर बिलाल मिया हे १९८८ आणि १९९८ मध्ये दोन वेळा बॉक्सानगर विधानसभा मतदारसंघातून निवडणून आले आहेत. दोन्ही नेते आपल्या पक्षातील अल्पसंख्याक समाजातील ज्येष्ठ नेते आहेत.

हे दोन्ही नेते भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. बिलाल मिया आणि मोबोशर अली यांना येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार आहे. माकपाने बुधवारी आपल्या ४७ उमेदवारांची घोषणा केली असून १३ जागा या मित्रपक्ष काँग्रेससाठी सोडल्या आहेत. अली यांच्यासह ७ विद्यमान आमदारांचे तिकीट माकपाने कापले आहे.

चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि माकपाच्या निवडणूक समितीचे सदस्य माणिक सरकार, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बादल चौधरी, तीन माजी मंत्र्यांचेही तिकीट कापण्यात आले आहे, यात तपन चक्रवर्ती, साहिद चौधरी, बनूलाल साहा यांचा समावेश आहे, त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना वगळण्यात आले असल्याचे समजते.

तर दुसरीकडे आपल्याला कमी जागा मिळाल्या म्हणून काँग्रेस पक्ष नाराज आहे. काँग्रेसचे एकमेव आमदार सुदीर रॉय म्हणाले,"माकपाने पहिले २७ जागा मागितल्या होत्या, नंतर २३ जागांची मागणी त्यांनी केली, "

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT