Mantalaya
Mantalaya Sarkarnama
मुंबई

Mantralaya News : मंत्रालयासमोरील आत्महत्या प्रकरणात 'ट्वीस्ट'; 'याच्या' सांगण्यावरून घडला का प्रकार?

सरकारनामा ब्युरो

Mumbai Crime News : मंत्रालयासमोर सोमवारी (ता. २७) दिवसभरात मुंबई, धुळे येथील महिलांनी तर पुण्यातील पुरुषाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील धुळ्यातील महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इतर दोघांबाबत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला आहे. या घटनांनी राज्यात एकच खळबळ उडालेली आहे.

धुळ्यातील मृत महिलेचे नाव शीतल गादेकर होते. दरम्यान, मंत्रालयासमोर घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती पुढे येत आहे. शीतल गादेकर (धुळे) आणि संगीता डावरे (नवी मुंबई) या दोघी सोमवारी मंत्रालयासमोर आल्या होत्या. चेहर्‍याला मास्क लावून आणि टॅक्सीत बसून त्या आल्या होत्या. मंत्रालयासमोर त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबविले. पण, काही प्रमाणात त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शीतल गादेकर यांचा मृत्यू झाला.

विष प्राशन करणाऱ्या गादेकर आणि डावरे यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. तसेच त्या वेगवेगळ्या भागातील आहेत. संगीता डावरे या नवी मुंबईतून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पत्नी आहेत. त्यांच्या पतीचा पाय एका शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला. त्या डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी डावरे यांची मागणी होती. तर शीतल गादेकर या धुळ्यातील आहेत. त्यांच्या पतीच्या निधनानंतर, पतीच्या नावे असणारी जमीन त्यांच्या मित्राने बळकावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र याबाबत प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही दुर्लक्ष होत होते. त्यातून त्यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, त्या दोघीही वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून एकत्रच कशा काय आल्या? तसेच त्यांनी एकत्रित विष प्रशान का केले? असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, या दोन्ही महिला एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या का? मग त्या व्यक्तीनेच या दोन्ही महिलांना मंत्रालयासमोर जाऊन आत्महत्या करण्याचा सल्ला दिला का? त्यानुसार पोलीस या कथित समाजसेवकाचा शोध घेत असल्याची माहिती आहे.

तिसऱ्या घटनेत पुण्याच्या मावळ तालुक्यातील रमेश मोहिते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अपंगांना अनुदानात वाढ करून देण्यात यावी. यासाठी रमेश मोहिते अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना अडवले आणि ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT