Nitesh rane| Bhagatsingh koshyari
Nitesh rane| Bhagatsingh koshyari  
मुंबई

राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे नितेश राणे एकटेच!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्येच (BJP) दोन परस्पर विरोधी मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार नितेश राणे यांच्यात राज्यपालांच्या वक्तव्यावरुन दोन परस्पर विरोधी मत प्रवाह असल्याचे दिसून येत आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) राज्यपालांच्या भूमिकेबाबत असहमत असल्याचे म्हटले आहे. तर नितेश राणेंना त्यांना समर्थन दिले आहे.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना, गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्याने राज्यातील चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपमध्ये मात्र मुळ भाजप लोकांनी राज्यपाल विधान पासून स्वतः दूर केले. पण दुसऱ्या पक्षातून भाजप मध्ये आलेल्या नेत्यांनी मात्र राज्यपालांची पाठराखण केल्याचे दिसत आहे.

नितेश राणे राज्यपालांच्या समर्थनार्थ ट्विटमध्ये म्हणतात, ''मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही, असा सवाल त्यांनी ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.

तर दूसरीकडे आशिष शेलार यांनी मात्र राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ''मा. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये!''असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

तसेच देवेंद्र फडवीस यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. पण महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं योगदान खूप मोठं आहे. राज्यपालांनाही याची जाणीव असेल. मात्र एखाद्या विशेष कार्यक्रमात आपण अतिशयोक्ती अलंकार वापरतो, त्या स्थितीतून राज्यपालांचं वक्तव्य आलं असावं. याबद्दल ते स्वतः स्पष्टीकरण देतील, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT