Anil Parab
Anil Parab  
मुंबई

राजकीय पुढाऱ्यांकडून एसटी संपाचे श्रेय लाटण्याचे प्रकार : अनिल परब

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील एसटी संपावर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना सेवेत हजर होण्याचे आवाहन केले आहे. 'एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्त्व कोण करतयं, याच्याशी आम्हाला घेणदेण नाही, पण संपामुळे (ST Strike) तुमचेच नुकसान होत आहे, कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचे नाही. कोणताही राजकीय पुढारी (Political Leader) संपकरी एसटी संपकऱ्यांची कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. संपात सामील झालेला प्रत्येक पुढारी संपाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुमची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही, असे म्हणत मंत्री परब यांनी एसटी संपकऱ्यांना कामावर हजर राहण्याची विनंती केली आहे.

एसटी कामगारांचा संप हा पगारवाढीसाठी आणि एसटी विलगीकरणासाठी होता. त्यातील त्यांची पहिली मागणी पुर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना भरगोस पगारवाढ देण्यात आली असून प्रत्येक महिन्याला १० तारखेच्या आधीच त्यांचा पगार करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असा विश्वास मंत्री परब यांनी व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी एसटी विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे. एसटीटे विलीनीकरण होत नाही तो पर्यंत संप संपणार नसल्याचा पवित्रा संपकऱ्यांनी घेतला आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. एसटी विलीनीकरणाचा विषय सध्या न्यायालयाच्या समितीसमोर आहे. विलीनीकरणाच्या निर्णयासाठी ससमितीला १२ आठवड्यांची मुदल मिळाली आहे. समितीचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल. विलगीकरणाचा निर्णय समिती शिवाय कोणही घेऊ शकत नाही, असेही मंत्री परब यांनी म्हटले आहे.

त्यामुळे कामगारांमध्ये अफवा पसरवून काही उपयोग नाही, तुम्ही संप मागे घ्या , आपण चर्चा करु तोडगा काढू. प्रश्न सोडवू. कामगारांची पगारवारवाढ आणि त्यांचे पगार वेळेत करणं ही आमची जबाबदारी असेल, पण संप मागे घ्या. संपामुळे तुमचेच नुकसान होत आहेत. कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच नाही, असा त्यांनी पुनरुच्चार केला.

याशिवाय, ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालये सुरु होत आहेत. तेथील विद्यार्थी आणि प्रवाशांची एसटी संपामुळे गैरसोय होत आहे. दररोज एसटीने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत, त्यामुळे कामावर रुजू व्हा, असे आवाहनही मंत्री अनिल परब यांनीकेलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT