Aaditya Thackeray, Uday Samant Sarkarnama
मुंबई

Uday Samant : दावोसला जाऊन किती उद्योग आणले? : सामंतांचा आदित्य ठाकरेंना सवाल!

Uday Samant : दावोसला जाऊन किती पैसा खर्च केला याचा हिशोब द्या!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्रातून उद्योग गुजरात आणि इतर राज्यात निघून जात असताना, आता यावरून राज्याचं राजकारण पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यासाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यातील विसंगतीवर बोट ठेवत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता सामंत यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

उद्योजक महाराष्ट्रात येतील, उद्योगपूरक महाराष्ट्रात वातावरण असावं, अशी आज स्थिती आहे. मात्र विरोधकांकडून कुठेतरी सरकारची बदनामी केली जात आहे. माझ्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली आहे. माझा राजीनामा मागणं सोपं आहे. मात्र त्यांनी सांगावं की, दावोसला जाऊन आपण किती उद्योग आणले, किती पैसा खर्च केला याचा हिशोब द्या, असा सवाल सामंतांनी आदित्य ठाकरे यांना विचारले आहे.

एअरबस प्रकल्पाबाबत तीन प्रश्न आहेत. हा प्रकल्प येण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. मात्र सरकारने काय प्रयत्न केले याचं रेकॉर्ड माझ्या विभागात उपलब्ध नाही. कुठल्यातरी नेत्याने प्रश्न विचारायचा आणि बाकीच्यांनी गळे काढायचे, असा हा प्रकार आहे. उद्योगमंत्री म्हणून मी टिका करणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, बारसू येथील प्रकल्पाबाबत उद्धवजींनी पत्र लिहिले, त्याबाबत काय झालं? असंही सामंत म्हणाले.

रिफायनरी प्रकल्पाबाबत त्यांची भूमिका काय आहे? त्याचं उत्तर त्यांच्याकडून असे येईल की, एखादा प्रकल्प जनेतेने स्विकारला तर तो घ्या, लोकांचा विरोध असेल तर स्विकारू नका, असे ते बोलतात. एकीकडे उद्योग जात असल्याबाबत ओरड करायची आणि जे प्रस्थावित प्रकल्प त्याला अडवून धरायचे, हे योग्य नाही, असे सामंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT