Uday Samant Latest News
Uday Samant Latest News Sarkarnama
मुंबई

Uday Samant : आव्हाडांच्या अटकेवर सामंतांची प्रतिक्रिया, म्हणाले, ज्या पद्धतीने मारहाण झाली..

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले होते आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद केला होता. यामुळे यावेळी मोठा राडा झाला होता.

याप्रकरणी आव्हाड यांच्यासह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना आज (ता.११ नोव्हेंबर) वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले. यावेळी त्यांना अटक करण्यात आली असल्याचे खुद्द आव्हाडांनीच माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

सामंत म्हणाले, मॉलमध्ये जी मारहाण करण्यात आली. तरुणाला मारलं गेलं. याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. ही कायदेशीर कारवाईची प्रकिया आहे, यावर कोणीही बोलणं योग्य होणार नाही. प्रेक्षकाला कोणाकडून मारहाण झाली. हे सर्वांनी पाहिलेलंच आहे"

"कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल असे वर्तन कोणाकडूनही घडू नये. मारहाणाची व्हिडीओ आल्यानंतर पोलिसांकडून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला कोणीही आव्हान देवू नये, बिघडवू नये. पोलिसांना आपलं काम करतायेत, त्यांचं त्यांना काम करू दिले पाहिजे," असे उदय सामंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT