Uday Samant and Uddhav Thackeray
Uday Samant and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

उदय सामंतांनी केले उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सरकारनामा ब्यूरो

Uday Samant News : राज्याचे उद्योग मंत्री व शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधान आलं आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका करताना बाळासाहेबांच्या विचाराचा कोणीही बाजार उठवू नये असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्धव ठाकरेंच्या या मताशी आम्ही सहमत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. सामंत माध्यमांशी बोलत होते.

सामंत म्हणाले, ''वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित बुधवारी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच नाव 'सावरकर ते बाळासाहेब विचारांचा वारसा' असं होतं. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचाराचा कोणीही बाजार उठवू नये, त्यांच्या या मताशी (उद्धव ठाकरेंच नाव न घेता) आम्ही सहमत आहोत'', असं सामंत म्हणाले.

''तीन दिवसांपूर्वी 'भारत जोडो' यात्रेत सावरकरांबाबत जे वक्तव्य केली गेली. त्याबाबत काही लोकांनी त्यांची भूमीका स्पष्ट करावी. त्याबाबतचे मत आम्हाला देखील कळायला हवे'', असा टोला सामंतांनी ठाकरेंना लगावला. ''बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा आदर आम्हालाच नाही तर सर्व महाराष्ट्राला (Maharashtra) आहे. सावरकर आणि बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, त्याबाबत आम्हाला अभिमान आहे,'' असं सामंत म्हणाले.

''सध्या काही जण बाळसाहेबांचे विचार जुमानत नाहीत. हे 'भारत जोडो' यात्रेच्या माध्यमातून दिसत आहे. मग नक्की बाजारूपणा कोण करतंय? हे सावरकर यांच्यावरील केलेल्या टिकेवरून स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेल्या उठावाविरोधात त्यांचा राग असू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येत आहे. पण 'पिक्चर अभी बाकी है'', असं म्हणत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सामंतांनी टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT