Udayanraje bhosale facebook
मुंबई

Udayanraje Bhosale : इंग्लंडमधील भवानी तलवारीबाबत उदयनराजे भोसले म्हणाले..

Shivaji Maharaj Jagdamba Sword : जनभावना लक्षात घेवून ही तलवार मोठ्या मनानं ब्रिटिश सरकारनं भारताकडं सोपवली पाहिजे,"

सरकारनामा ब्युरो

Shivaji Maharaj Jagdamba Sword : "छ्त्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडच्या सरकारकडे त्यांच्या संग्रहालायत आहे. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी आणि भारताचा तसेच महाराष्ट्राचं स्वाभिमान आहे. यामुळे जनभावना लक्षात घेवून ही तलवार मोठ्या मनानं ब्रिटिश सरकारनं भारताकडं सोपवली पाहिजे," असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी साता-यात व्यक्त केली. (chatrapati shivaji maharaj jagdamba sword news update)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "हे अनधिकृत बांधकाम काढलं गेलं पाहिजे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय. सोबत या कारवाईचं राजकारण करण्याची गरज नाही," असंही ते म्हणाले.

प्रतापगड येथील अफझल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. याविषयी त्यांना विचारले असते ते म्हणाले, "अफझल खान कबरी शेजारील काढलेलं अतिक्रमण हे योग्यच आहे. राज्य सरकारनं कायद्याचा आधार घेवून केलेली कारवाई आहे. ही योग्यच असून या भुमिकेला माझे समर्थन आहे. या कारवाईला राजकीय वळण देवू नका तसेच प्रतापगडावरील अफझल खान कबर ही लोकांसाठी खुली करा,"

उदयनराजे भोसले म्हणाले, "लोकांना आणि पुढील तरुण पिढीला हा इतिहास कळावा यासाठी ही कबर सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी. यासाठी राज्य सरकारनं विचार करावा. अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीमध्ये काहीही दगा फटका होऊ शकला असता तरी सुध्दा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या मनाने त्याची कबर बांधली. परंतु कालांतराने तिथे अतिक्रमण वाढत गेलं. तरुण पिढीला इतिहास समजण्यासाठी ती कबर खुली केली पाहिजे,"

"अतिक्रमणावर राज्य शासनाने जी कारवाई करायची होती ती योग्य पद्धतीने केली. ही कारवाई मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे, असा समज कोणी करून घेऊ नये. कायद्याच्या आधारावर राज्य शासनाने केलेली कारवाई योग्यच आहे.अतिक्रमण काढण्याच्या कारवाई ला राजकीय स्वरूप देऊ नका," असे त्यांनी नमुद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT