Udayanraje Bhosale  |Sanjay Raut
Udayanraje Bhosale |Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी राऊतांची लाज काढली...

सरकारनामा ब्युरो

Udayanraje Bhosale on Sanjay Raut : छत्रपती घराण्याविषयी बोलताना थोडी तरी लाज बाळगा. ज्या राजघराण्याविरोधात तुम्ही बोलत आहात, त्याच राजघराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे. अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत आणि छत्रपती घराण्यातील तीनही राजे यांच्यात शाब्दिक चकमकी झडत आहेत. राजे हे अनाजी पंतांचे चेले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी केली होती. टीका करताना राऊतांचा रोख माजी खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या दिशेने होता. राऊतांनी थेट छत्रपतींच्या घराण्यावरच टीका केल्याने राज्यभरातून त्यांच्या विरोधात नाराजीचा सुर उमटत होता. अशातच आता राऊतांच्या या टीकेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी खास आपल्या स्टाईलने समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांचा स्वभाव विकृत आहे. त्यांच्या या विकृत स्वभावामुळेच ते राजघराण्यावर वारंवार टीका करत असून त्यांची ही विकृती वाढत चालली आहे. पण राजघराण्यावर बोलताना मोजूनमापूनच बोलायला पाहिजे. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करणं योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

काही महिन्यापूर्वी याच संजय राऊतांनी आम्हाला छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले होते. पण आता त्यांची विकृती टोकाला गेली आहे. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोकं काहीही बरळत आहेत. राजकीय स्वार्थासाठी ते काहीही वक्तव्ये करत आहे. आता तर निर्लज्जपणाची हद्दच झालीये. अशा शब्दात त्यांनी थेट राऊतांची लाज काढली आहे.

काही विषय नसेल तर राजघराण्यावर टीका केली जाते. ज्या राजघराण्याविरोधात तुम्ही बोलत आहात, त्याच राजघराण्यामुळे आज तुमचा पक्ष उभा आहे. त्याची तरी लाज बाळगा, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला आहे. छत्रपतींच्या घराण्याचा अनादर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT