MP Udyanraje Bhosale and BJP Leader Devendra Fadanvis 
मुंबई

सातारच्या हद्दवाढीचे श्रेय उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हद्दवाढीसाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यामुळेच हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्यात पोहोचला गेला.तसेच उत्तरेस मौजे करंजेचा वेण्णानदीपर्यंतचा भाग, तर दक्षिणेस नवीन हायवेच्या किल्याकडील भागासह संपूर्ण अजिंक्यतारा किल्याचा समावेश शहर हद्दीत झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

सातारा : ऐतिहासिक सातारा शहराची प्रलंबित हद्दवाढ मंजूर केल्याबद्दल साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सातारकरांच्यावतीने आभार मानले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हद्दवाढीचा
प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला गेला, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

सातारा शहराच्या हद्दवाढीस आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंजूरी दिली. यासंदर्भात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक
पेजवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. 

उदयनराजेंनी म्हटले की, सातारा शहर मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिध्द आहे. सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची हद्दवाढ 1977 पासून
प्रलंबित होती. तथापि 1997-98 मध्ये नव्याने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यास अनेक कारणाने अडथळे निर्माण झाले होते. महत्वाचा
टप्पा म्हणजे जिल्हा परिषदेचा ठराव हद्दवाढीला पारित होणे आवश्यक होते.

तो पारित करून हद्दवाढीतील सर्वांत मोठा अडसर दूर करण्यात आला होता. त्यानंतर
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हद्दवाढीसाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यामुळेच हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्यात पोहोचला गेला. तसेच उत्तरेस मौजे करंजेचा वेण्णानदीपर्यंतचा भाग, तर दक्षिणेस नवीन हायवेच्या किल्याकडील भागासह संपूर्ण अजिंक्यतारा किल्याचा समावेश शहर हद्दीत झाला आहे.

तर पश्चिमेस यवतेश्वरच्या पायथ्यापर्यंत दरेखुर्द पर्यंतचा संपूर्ण भागाचा समावेश नगरपरिषद हद्दीमध्ये झाला आहे. पूर्वी नगरपरिषदेचे क्षेत्र 8.15 स्के.कि.मी.
होते. या मंजूर हद्दवाढीमुळे ते आता 25.91 स्के.कि.मी.इतके झाले आहे. नवीन भाग नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट झाल्याने लोकसंख्या सुमारे दोन लाख झाली
आहे.

सातारा शहर हद्दीलगल असणा-या उपनगरातील बहुतांशी सर्व नागरीक आपल्या दैनंदिन व्यवहाराकरीता सातारा शहरात येत असतात. या तरंगत्या लोकसंख्येचा
फार मोठा बोजा नगरपरिषदेवर पडत होता. आता हद्दवाढ झाल्याने नगरपरिषदेच्या विस्ताराला वाव मिळाला आहे. नवीन लोकसंख्या आणि भागाचा समावेश  नगरपरिषदेत झाल्याने या भागातील सर्व नागरीकांना मुलभूत सोयी सुविधेकरीता यापुढे नगरपरिषदेला विचारणा करता येणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे सातारा शहरात प्रवेश करताना, ग्रामपंचायत हद्दीत आणि त्रिशंकू भागातील कच-याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्ते, गटर, पाणी, दिवाबत्ती
आदी सुविधांसह आता जुने आणि नवीन समाविष्ट नागरीक यांच्या सर्वांगिण विकासाकरीता नियोजनबध्द प्रयत्न केले जातील. सातारा शहरातील ग्रेडसेपरेटर, सातारचे मेडिकल कॉलेज, कास धरणाची उंची वाढवणे, शहराची हद्दवाढ आदी कामांचा पाठपुरावा करुन त्यास वाचा फोडल्यामुळेच हे प्रश्न पुढे मार्गी लागले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 


 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT