Vinayak Raut, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : धारावी मोर्चासाठी 'ठाकरे गट' सज्ज

सरकारनामा ब्यूरो

धारावी पुनर्विकासाचे कंत्राट मिळालेल्या उद्योगक अदानींच्या धारावीतील अदानी प्रॉपर्टीजच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे. धारावी पुनर्विकासावरून ठाकरे गट दुपारी ३ वाजता धारावीत मोर्चाला सुरुवात करणार आहे. मोर्चानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करणार आहेत. हा मोर्चा आणि सभा प्रचंड मोठी होईल, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.

मोर्चापूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोर्चाच्या मार्गाची पाहणी केली. यावेळी धारावीकडे झोपडपट्टी म्हणून पाहू नका तर ती उद्योगनगरी आहे, हे लक्षात घ्या, असे सांगितले. म्हणूनच धारावी वाचवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सरसावल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय या मोर्चासाठी धारावीत गल्लोगल्ली ३०० हून जास्त सभा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

धारावीतील सर्व रहिवाशांना घरे द्या आणि ती घरे ३०० चौरस फुटांची नाही तर ४०० ते ५०० चौरस फुटांची द्या, अशी ठाकरे गटाची आग्रही मागणी आहे. शिवाय बीडीडी चाळींप्रमाणे धारावीचा विकास करा, डीटीआरची बँक करण्यासाठी धारावीचा पुनर्विकास नको, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. या मागणीसाठी दुपारी तीन वाजता धारावी टी जंक्शनपासून मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर मोर्चा बीकेसीच्या दिशेने जाईल. पुढे सीएनजी पेट्रोल पंपापासून परिमंडळ ८ जवळ मोर्चा थांबेल. बीकेसीच्या फटाका मैदानात मोर्चाचे सभेत रुपांतर होईल.

(Edited by - Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT