Uddhav Thackeray :
Uddhav Thackeray :  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : "अमित शाहंचा सल्ला नवीन नाही, निकालापर्यंत फक्त महाराष्ट्राने थांबायचं का?'

सरकारनामा ब्यूरों

Uddhav Thackeray : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची राज्या सीमावादावर दिल्लीत बैठक पार पडली. यावर सीमाप्रश्नांवरती दोन्ही राज्यांचा विचार करून काही निर्णय घेण्यात आले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीमध्ये जी बैठक झाली पार पडली. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री होते. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांचं ट्विटर हॅक झालं होतं. महत्वाचा मुद्दा हा आहे की, मागील १५ ते २० दिवस हा प्रश्न चिघळला जातोय, मात्र याचा खुलासा करायला इतके दिवस का लागले? पोलिस कारवाई झाली होती, ती ट्विटर नाही तर प्रत्यक्ष कारवाई झाली होती. प्रत्यक्षात अटक केले जात होते. महाराष्ट्रातील वाहनांना बंदी झाली होती. मात्र याचा खुलासा बैठकीपर्यंत का केला गेला नाही?

अमित शहांनी दिलेला सल्ला हा काही नवीन नाहीये. न्यायालयात जोपर्यंत प्रश्न प्रलंबित आहे, तोपर्यंत दोन्ही राज्यांनी काही करू नये, हा नवीन सल्ला नाही. पण हे प्रकरण न्यायालयात किती वर्षे प्रलंबित आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कर्नाटकने बेळगावला उपराजधानीचा दर्जा कसा दिला? बेळगावात अधिवेशन अजूनही सुरू आहेत. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत फक्त महाराष्ट्राने थांबायचं का? असा, सवाल ठाकरेंनी विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT