Eknath Shinde News, Uddhav Thackeray News, Maharashtra Political Crisis news  Sarkarnama
मुंबई

"बंडखोरांनो परत फिरा रे, घराकडे आपल्या", उद्धव ठाकरेंची साद...

Uddhav Thackeray | Eknath Shinde : अजूनही वेळ गेलेली नाही...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांसह तब्बल ५१ आमदार महाविकास आघाडी सरकारला अस्थिर परिस्थितीमध्ये टाकून गुवाहटीमध्ये मुक्कामी गेले आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना माघारी येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी पुन्हा एकदा सर्व आमदारांना परत या, समोर बसा, बोलू, मार्ग काढू असे आवाहन केले आहेत. (Uddhav Thackeray News)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो.

कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र,

उद्धव बाळासाहेब ठाकरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT