Sanjay Raut Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Shivsena News: शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार फुटणार? मातोश्रीवरुन धडकला नवा आदेश; 22 जूनला मोठा निर्णय होणार..?

Uddhav Thackeray Shivsena Politics: उद्धव ठाकरेंचे 7 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते लवकरच यासंबंधीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार असल्याचंही बोललं जात आहे. याचदरम्यान, ठाकरेंच्या खासदारांसह आता आमदारही फुटणार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाची चर्चांनी राजकारण तापवलं असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरेंचे 7 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते लवकरच यासंबंधीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार असल्याचंही बोललं जात आहे. याचदरम्यान, ठाकरेंच्या खासदारांसह आता आमदारही फुटणार असल्याचा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी 22 जूनला आमदारांचीही बैठक बोलावली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अस्वस्थता पसरली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (14 जून) मुंबईतील 'मातोश्री' येथे निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, या महत्त्वपूर्ण बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदार उपस्थित राहिल्याचं समोर आलं होतं.

या बैठकीला रविवारी आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला गैरहजर राहिलेले संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर, मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीलाही गैरहजर होते. शिर्डीचे खासदार वाकचौरे हे बैठकीच्या काही तास आधीच 'नॉट रिचेबल' झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरुन ठाकरेच्या शिवसेनेकडून एकीकडे गैरहजर खासदारांबाबत सारवासारव केली जात आहे.

याचदरम्यान,शिवसेनेतील आमदार कृपाल तुमाने यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम बोलणी झाल्याचा गौप्यस्फोट केला होता.

त्यांनी या आमदार व खासदारांच्या पक्ष प्रवेशाची फक्त तारीख ठरायची असल्याचं म्हटलं होतं. तसेच संबंधित खासदार व आमदार हे उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराज असल्यानं ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT