Uddhav Thackeray|
Uddhav Thackeray| 
मुंबई

राज्यपालाचं वक्तव्य त्यांच्या ओठातून आले की कोणी त्यांच्या पोटात टाकले ; ठाकरेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. त्यांनी जे वक्तव्य केले ते अनावधानाने नाही तर जाणून बुजून केले. ते वक्तव्य त्यांच्या ओठातून आले की कोणी त्यांच्या पोटात टाकले, असा सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.

शुक्रवारी (२९ जुलै) मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना, गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्याने राज्यातील चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

अलीकडच्या नवहिंदूत्त्ववाद्यांना मोड फुटले आहेत. या मोडधारी सत्ताधारी हिंदूंनी राज्यपाल नावाच्या पार्सलला घरी पाठवायच किंवा तुरुंगात हे ठरवण्याची वेळ आली आहे. कोश्यारींना नमक हरामी केली. राज्यपालांनी हिंदूंमध्ये फुट पाडण्याच प्रयत्न केला. राज्यपाल पदाचा मान ठेवला नाही, राज्यपालांनी खुर्चीचा मान राखला पाहिजे. त्यांच हे वक्तव्य नीचंपणाचं असल्याचा घणाघातही त्यांनी केला. त्यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा अपमान केला. आता कोश्यारींवर कारवाई झालीच पाहिजे आहे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

तसेच, "राजपाल हे मानाचं पद आहे. राजपालपदाचा मी अपमान करु इच्छित नाही. कोश्यारींनी राज्यपालांच्या खुर्चीचा मान ठेवलेला नाही. महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात,"असा सवाल उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांनी उपस्थित केला आहे. "महाराष्ट्राला गड-किल्ले, खाद्य पदार्थ, पैठणी अशी विविध संस्कृती आहे. राज्यपालांनी या सगळ्याचा अनुभव घेतला आहे. त्यांनी कोल्हापुरी जोडा पाहिलेला नाही. राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखविण्याची गरज आहे," असा हल्लाबोल ठाकरेंना आज केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT