Uddhav Thackeray-BhagatSingh Koshyari
Uddhav Thackeray-BhagatSingh Koshyari Sarkarnam
मुंबई

Thackeray On Koshyari : काळी टोपीवाले म्हणत उद्धव ठाकरेंचा कोश्यारींवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : एक कोळी टोपीवाला आला होता, तो गेला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तरीही हे गद्दार आणि भाजपवाले शेपट्या आतमध्ये घालून बसले होते. त्यांच्या शेपट्या बाहेरच येत नाहीत. दिल्लीसमोर शेपट्या आत घालून बसणे, हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र सोडले (Uddhav Thackeray criticizes former Governor Bhagat singh Koshyari in bitter words)

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशानिमित्त खेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, तोफा देशद्रोह्यांच्या विरोधात वापरायच्या असतात. पण, दुर्दैव असं की ज्यांना आपण आपलं कुटुंबीय मानलं. त्यांना मोठं केलं. त्यांनी आपल्या आईवर वार केले. होय, शिवसेना आमची आई आहे. शिवसेना ही चार अक्षरं नसती तर आपण कोण होतो?

आज जे टिमक्या वाजवत आहेत की, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहेत. त्यांना मला सांगायचं आहे, तुमचा जन्म झाला नसेल. त्यावेळी इकडे किशोर कानडे होते. मुंबईनंतर कोकणात शिवसेनेचा भगवा फडकला. आम्ही म्हणजे शिवसेना, आम्ही शिवसेना बांधली, असे जे म्हणतात, त्यांनी माझे आव्हान स्वीकारावे. शिवसेना हे नाव बाजूला ठेवा आणि तुमच्या आई-वडिलांचे नाव लावून पक्ष बांधून दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की, अनेकजण असे आहेत की, त्यांनी बाळासाहेबांना जवळून बघितलेलेही नाही, ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार. ज्यांचं आयुष्य गेल्या दहा-पंधरा वर्षांत तुमच्या आशीर्वादाने फुललं, ते आम्हाला बाळासाहेबांचं विचार शिकवत आहेत. उद्योगधंदे बाहेर जात आहेत, तो बाळासाहेबांचा विचार होता का? कर्नाटकाचे मुख्यमंत्री डोळे वटारून बघत आहेत, तरी हे शेपटू आत घालून बसले आहेत.

मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला. तुम्ही बाहेर जाऊन सांभाळू शकलेला नाही. दिल्लीपुढे मुजरा करण्यात यांचे अर्धे आयुष्य, तर काहींना खोके मिळालेले नाही, तर मंत्री केले नाही, त्यांना सांभाळता, सांभाळता अर्धे आयुष्य जात आहे. महाराष्ट्रात एकाही मृतदेहाची विटंबना झालेली नाही. मग योगीच्या राज्यात कसं झाले, याचाही विचार करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT