Uddhav Thackeray latest marathi News Sarkarnama
मुंबई

बंड थंड करण्याची ताकद माझ्यात आहे; ठाकरेंचा इशारा

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी शिवसेना (Shivsena) संपत असल्याचे वक्तव्य केले होते.

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray : मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी शिवसेना (Shivsena) संपत असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच सगळे पक्ष संपेल फक्त भाजप राहिल, विधान नड्डा यांनी केले होते. या विधानावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केल्या बंडानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना भेटत आहेत. आज जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर आले होते. या वेळी शिवसैनिकांचे संबोधताना उद्धव ठाकरे यांनी जे. पी. नड्डांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर टीकी केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गेले महिनाभर येथे गर्दी आणि गर्दीच आहे. आपली लढाई दोन-तीन पातळीवर सुरु आहे. एकतर रस्त्यावरची लढाई, त्याच्यात तर आपण कमी पडणारच नाही. दुसरी लढाई न्यायालयात सुरु आहे. तिसरी लढाई तेवढीच महत्वाची आहे ती लढाई ही शपथपत्र आणि सदस्यांची आहे. हा विषय फार गंभीर आहे. कायद्याची लढाई सुरु आहे, आपले वकिल योग्य बाजू मांडत आहेत. किल्ला लढवतायत, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. ही लढाई आपण जिंकणारच असा विश्वास यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केला.

जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचाही समाचार यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. बंड याआधीही झाले होते, मी याआधीही अनेक बंडांना सामोरे गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मात्र, आता शिवसेना संपवण्याची भाषा केली जात आहे. राजकारणात हार-जीत होतच असते. मात्र, आता थेट संपवण्याची भाषा केली जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. तसेच अनेक आव्हाने पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT