Uddhav Thackeray Vs Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray On Union Budget : 'दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये..' ; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र!

Uddhav Thackeray Vs Narendra Modi : बिहार, आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद नसल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारवर टीका सुरू केली आहे.

Mayur Ratnaparkhe

Maharashra and Union Budget 2024 News : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज जाहीर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यामुळे सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रामध्ये विशेष तरतूद करण्याचा सरकाचा प्रयत्न दिसून आला. विशेष म्हणजे बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांसाठी विशेष तरतूद केली गेली आहे. मात्र महाराष्ट्रासाठी अशाप्रकारे कोणतीही तरतूद न केल्या गेल्याने विरोधकांनी आता मोदी सरकारवर टीका सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली.'

तसेच, 'महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे !' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

मोदी(Narendra Modi ) सरकारने अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला झुकते माप दिल्याचे दिसते. मात्र, अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. यावरून विरोधक संतापले आहेत. महाराष्ट्राशी हा दुजाभाव का, असाल विरोधकांनी केला आहे.

तर फडणवीस( Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, याची यादीच वाचून दाखवली. तसेच महाराष्ट्र भाजपच्या एक्स हँडलवरही ही यादी देण्यात आली आहे. ज्यांना अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशा ‘उबाठां’साठी हा सोप्या भाषेतला अर्थसंकल्प, अशी खोचक टीका भाजपने केली आहे.

ही यादी बरीच मोठी आहे. बजेट संपूर्णपणे न वाचता उचलली जीभ लावली टाळ्याला या विरोधकांच्या वृत्तीला हे उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला कायमच प्राथमिकता दिली आहे. विरोधक कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता फक्त राज्यातल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा निशाणा भाजपने साधला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT