Uddhav Thackeray, Amit Shah
Uddhav Thackeray, Amit Shah sarkarnama
मुंबई

जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू; ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray : मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजपमधील (BJP) संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुंबई दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची भाषा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शहा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले. गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसले. आम्हाला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू, असा इशारा ठाकरे यांनी दिला. सोबतच उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांपेक्षा सोबत असलेले मुठभर निष्ठावंत कधीही बरे असे सांगत शिंदे गटावरही टीका केली.

मुंबईतल्या राजकारणावर भाजपचे वर्चस्व असावे. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरे यांना जागा दाखवली पाहिजे, या अमित शाह यांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू. त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. थोडक्यात काय तर संघर्षाचा काळ आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना संपवायला निघाले आहे, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला. निष्ठा ही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपद ही माझी खासगी मालमत्ता नाही. मुख्यमंत्री पद हवे असते तर मी क्षणभरात सोडल असते, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. माझ्याकडे तेव्हा 30-40 आमदार होते. त्यांना डांबून ठेवले असते. माझी देखील ममता बॅनर्जी यांच्याकडे ओळख होती. त्या आमदारांना तिकडे घेऊन गेलो असतो, असा टोला त्यांनी बंडखोर आमदारांना लगावला. किमान कालीमातेच्या मंदिरात नेले असते, राजस्थानात त्यांना नेता आले असते पण तो माझा स्वभाव नसल्याचे ठाकरे म्हणाले. त्यामुळे सर्वांना सांगितले की, दरवाजा उघडा आहे. राहायचे असेल तर निष्ठेने राहा नसेल तर तिकडे जा, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT