मुंबई

माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला : ठाकरेंनी वेदना बोलून दाखविल्याच

Uddhav Thackeray | Shivsena | : उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज बंडखोर आमदारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आमच्याबद्दल या आमदारांना प्रेम वाटत असल्याबद्दल धन्य झालो. पण तेच माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होत असताना दाखवायला हवे होते. त्यावेळी कोणीच बोलले नाही, आणि आज त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. तसेच या लोकांनी माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, असे म्हणतं त्यांनी त्यांच्या वेदनांनाही वाट मोकळी करुन दिली. (Uddhav Thackeray Latest News)

उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, अनेकजण गप्प असलेले आता बोलायला लागले आहेत. मातोश्रीतून सन्मानाने बोलावणे आले तर जाऊ, भाजपशी (BJP) जुळवून घेण्यास तयार असतील तर आम्ही यायला तयार असल्याचे सांगत आहे. शिवाय माझ्याबद्दल, आदित्यबद्दल त्यांना त्यांना अजूनही प्रेम वाटत असल्याने मी धन्य झालो, असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला.

माजी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हेच प्रेम गेली दोन-अडीच वर्षे का दाखवले नाही? आजपर्यंत आमच्यावर बोलायची कुणाची हिमंत नव्हती. पण जो पक्ष माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करत होते, ज्यांनी विकृत भाषेत टीका केली. माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांच्यावर हे लोक बोलले नव्हते. त्यावेळी दातखीळ बसली होती का, असा सवाल ठाकरेंनी केला. तसेच आज त्यांच्याच गाठीभेटी हे घेत आहात. त्यांच्या मांडीवर बसत आहात. हे प्रेम तकलादू आहे का. हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

मला कुठेही वादविवाद होऊ द्यायचा नाही. यापूर्वी मी त्यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी आमचे अपमान केले, अत्यंत वाईट वागले. त्यांच्यासोबत जाऊन तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो आनंद तुम्हाला लखलाभ, असं सांगत ठाकरे यांनी बंडखोरांना खडसावले. तसेच काही दिवसात सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT