Eknath Shinde, Uddhav Thackeray, Advay Hiray
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Advay Hiray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray On Shinde Group: "बरे झाले गद्दार गेले म्हणून हिरे सापडले"; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल!

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : राज्यात सत्तांतर घडून शिंद फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विविध पक्षांतून शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार इमकमिंग सुरु आहे. नाशिकमध्ये मात्र वेगळे चित्र दिसून आले आहे. नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील भाजपचे नेते डॉ. अद्वय हिरे (Dr. Advay Hiray) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांना जोरदार टोला लगावला आहे.ठाकरे म्हणाले,"बरे झाले गद्दार गेले आणि हिरे सापडले, असे ठाकरे म्हणाले. सेना भवनात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हिरे यांनी हातात शिवबंधन बांधले आहे.

दरम्यान, ठाकरे गटात पक्षप्रवेशापूर्वी हिरे यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (२२ जानेवारी) उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यानुसार अखेर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT