Eknath Shinde , Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पुढचा धक्का थेट दिल्लीतून...; तब्बल पाच खासदार शिंदेंच्या संपर्कात?

Shivsena News : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांना सत्तेत जाण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचं दिसून येत आहे. कारण अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांत उड्या मारण्यास सुरुवात केली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता महायुतीनं विरोधी पक्षांतील दिग्गज नेत्यांना गळाला लावण्याचं काम सुरू केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्क्यावर धक्के दिले जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती खळबळजनक माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांना सत्तेत जाण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचं दिसून येत आहे. कारण अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांत उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून संबंधित खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 27 जुलैपासून सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरू होण्यापूर्वी किंवा अधिवेशनाच्या कालावधीत एकूण पाच खासदार एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेच्या संपर्कात आहेत. हे खासदार शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कात असतील तर हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का असणार आहे.

महायुतीकडून स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या इन्कमिंगसाठी गळ टाकण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर परिषद,नगर पंचायत,महानगरपालिका यांच्या निवडणुका जिंकण्याच्यासाठी महायुतीनं पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

लोकसभेच्या संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर महाविकास आघाडीलाही या 'ऑपरेशन टायगर'चा मोठा धक्का असणार आहे. कारण लोकसभेत महाविकास आघाडीचं संख्याबळ कमी होणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी जंग जंग पछाडलं आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल पाच खासदार जे शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, त्यांना रोखण्यासाठी काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्याची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष निवडणूका एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यातच आता एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासकामे थांबवत असल्याची तक्रार केल्याने आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT