Uddhav Thackeray|Devendra Fadanvis
Uddhav Thackeray|Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

'' देवेंद्र फडणवीसांसारख्या नेत्याला भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्र धुण्याचं काम करावं लागतंय!''

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray Party criticism on Devendra Fadnavis : हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,कृषिमंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचवेळी सत्ताधार्यांकडून देखील विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. याचवेळी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरुन 'सामना'च्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप, शिंदे गटावर खरमरीत टीका करण्यात आली आहे. (Uddhav Thackeray Party criticism on Devendra Fadnavis)

शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळख असणार्या 'सामना'च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis) भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. विधानसभेत भ्रष्टाचारविरोधी हंगामा सुरू आहे सरकारातील मंत्री रोज नवे भूखंड पचवून ढेकर देत आहेत आणि फडणवीस या भ्रष्टाचाराचे समर्थन करीत आहेत.

सभोवती भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फुटत असतानाही ते म्हणतात, कुठे काय मला तर लवंगी फटाक्याचाही आवाज ऐकू येत नाही या जादूटोण्यास काय म्हणावे? नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे पण फडणवीसांना काहीच दिसत नाही ऐकू येत नाही. त्यांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय? असा सवाल सामनातून फडणवीसांना करण्यात आला आहे.

हे सरकारच्या निर्ढावलेपणाचे लक्षण...

हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी फोडलेला हा बॉम्ब लवंगी फटाक्याच्याही तोडीचा नाही असं वाटणं हे सरकारच्या निर्ढावलेपणाचे लक्षण आहे. फडणवीस हे कोणत्या जादूटोण्याच्या दबावाखाली काम करत आहेत? की विरोधकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध फोडलेले बॉम्ब त्यांना अस्वस्थ करत नाही.

महाराष्ट्राने आता प्रगती केली असून शे-पाचशे कोटींचा गैरव्यवहार म्हणजे चिल्लर आहे.यापेक्षा काही मोठा घोटाळा असेल तर बोला! आमच्या राज्यात शे-पाचशे कोटींचे घोटाळे होणारच असंच फडणवीसांना सांगायचं आहे काय? संजय राठोड, उदय सामंत, शंभू देसाई अशा मंत्र्यांचेही घोटाळे समोर आले आहेत. ही भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्र धुण्याचं काम महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना करावं लागत आहे.

तसेच इतके गंभीर प्रकरणंही फडणवीस यांना विचलित करत नसेल तर त्यांची संस्कृती व संस्कार बदलले आहेत व भ्रष्टाचाराची प्रकरणे ते गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. कदाचित शिंदे गटाची लुटमार नजरेआड करा अशा सूचना त्यांना दिल्लीहून आल्या असाव्यात किंवा महाराष्ट्रभर सुरू असलेल्या जादूटोण्याचा हा परिणाम असावा असाही टोलाही ठाकरे गटाने सामनातून फडणवीसांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT