Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : '..म्हणून मी काँग्रेसचा गमचा घातला' ; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं!

Uddhav Thackeray at Congress Program : मुंबई आयोजित काँग्रेसच्या सद्भावना मेळाव्यातप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते, यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणाही साधला.

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray at Congress Melava : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त मुंबईत काँग्रेसचा आज सद्भावना संकल्प दिवस मेळावा होता. या मेळाव्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुपारी षणमुखानंद सभागृहात हा मेळावा झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळव्यास महत्त्व प्राप्त झालं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शिवाय, याप्रसंगी उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) काँग्रेसचा पंचा गळ्यात घालण्यात आला, ज्यावरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, 'आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितला की काँग्रेसच्या(Congress) कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का?. मगाशी मी तो काँग्रेसचा गमचाही घातला, एक आदर केला मान ठेवला. आता उद्या नक्कीच फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मो तो गमचा घातला. कारण, स्वत:चं कर्तृत्व सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाहीच. मग आपण काय करतोय हे मोठं करून दाखवायचं. दाखवा, काय दाखवायचंय ते दाखवा. यावेळी थोडक्यात वाचलात. नाहीतर देशाने यांना बरोबर हात दाखवला होता.'

याचबरोबर 'मी काँग्रेसच्या विरोधातील माझ्या वडिलांची भाषणं ऐकत ऐकतच मोठा झालो. एक गोष्ट नक्की जे पटत नव्हतं ते तेव्हाही बोलत होतो, आज बोलतो आणि उद्याही बोलेन. पण त्या बोलण्याला त्या विरोधाला सूड भावनेने आम्ही कधी बोललेलो नाही. आम्ही नेहमीच सदभावनेच्या बाजूने होतो. विरोध तर आम्ही कडाडून करत होतो पण सूड भावनेने कधीही काँग्रेस आमच्याशी वागली नाही आणि आम्ही देखील काँग्रेसशी वागलो नाही. याला राज्यकर्ता म्हणतात.' असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

याशिवाय 'राजीव गांधींवरही सडेतोड शब्दांमध्ये शिवसेनाप्रमुखांनी टीका केली. पण कधीही त्या काळात शिवसैनिकाच्या घरी ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय आलेले मला अजून तरी आठवत नाही. आम्हीतर तेव्हा विरोधात होतो. अनेकदा माणसं कळायला काही जरा वेळ जातो. तसंच राजीव गांधी कळायला वेळ लागला. तसं आताची लोकं कशी आहेत, हे कळायला थोडा वेळ लागला. पण माणसं कळल्यानंतर आपण सुधरलं पाहीजे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT