Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray news : ठाकरेंनी मनावरच घेतले ; फक्त 'इंडिया'च नाहीतर राज्यात 'या' पक्षांच्या मदतीने भाजपची कोंडी

Shivsena News : उद्धव ठाकरें यांनी समाजवादी पक्षांशी युती केली आहे.

Amol Jaybhaye

Mumbai News : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशात 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांची मोठ बांधने सुरू आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातही उद्धव ठाकरे अनेक छोट्या-मोठ्या संघटनांना एकत्र करुन आघाडी उभी करत आहेत. त्यातच त्यांनी आता राज्यातील समाजवादी पक्ष आणि संघटनांना एकत्र केले आहे. रविवारी या पक्षांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठक घेतली.

या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे म्हणाले, मला विश्वास बसत नाही की समाजवादी लोकांनी कुटुंब प्रमुख मानले. मला लाडके माजी मुख्यमंत्री मानले... आज तुम्ही मला फुलेंची पगडी दिली. मी म्हटले मला हातात द्या, डोक्यावर नको, ती झेपण्यासाठी तेवढच डोकं हवं. टोपीखाली काय आहे...काहींना डोकी नसतात 21 संघटना माझ्यासाठी एकत्र आल्यात हे भाग्य समजतो. शिवसेना (Shivsena) प्रमुख मला कायम सांगायचे लोकांना तू आवडावे म्हणून खोटे मुखवटे घालू नकोस.

माझा जन्म झाला तोवर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपली होती. एक काळ होता जेव्हा माझे आजोबा कितीही वाजले तरी आचार्य अत्रे यांचा फोन यायची वाट पाहत बसत असत. त्यांचा वाद सुरू होता. मात्र, आमच्यासमोर कधीही अत्रे चूकीचे आहेत असे वाईट बोलले गेले नाही. त्यांचा मोठेपणा सांगितला जायचा, असेही ठाकरे म्हणाले.

आपली लढाई व्यक्तिगत नव्हती...वैचारिक होती म्हणून आज आपण एकत्र येऊ शकतो. समाजवादी चळवळीने नेहमी दिशा दिली. केडर आहे तर भिती कशाची ? मी शिवसेना पक्षप्रमुख आहे पण माझ्यामते महत्वाचा कोण आहे तर तो गटप्रमुख, त्याला काही माहिती नसते वरती काय होते ते दही चोरणारे लोकं आहेत. आम्ही 20-25 वर्षे एकत्र होतो. मुंबईसाठी सगळी समिती एकत्र आली होती तेव्हा जनसंघ घुसला होता...त्यांना घुसण्याची सवयच आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला.

आम्ही 25-30 वर्षे एकत्र होतो, दूर का झालो त्यांच्यापासून ? इतिहास वाचून तो समजून घेता आला पाहिजे तर फुलेंच्या पागडीला अर्थ आहे. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये मुंबईसाठी सगळे एकत्र आले होते. त्यावेळी त्या समितीमध्ये जनसंघ घुसला होता... कश्यासाठी तर काही जागा लढवता आल्या तर पहव्या म्हणून. तेच आमच्या बरोबर केले. ज्यावेळी त्यांना कळले की हिंदू मत एकत्र करून निवडणुका जिंकता येतात तेव्हा ते आमच्या सोबत आले. आज तुम्ही माझ्यासोबत आलात. काही नकोय तुम्हाला, पण तुम्ही मागितले तरी मी काहीच देऊ शकत नाही...माझ्या हातात काहीच नाही.

भाजप (BJP) म्हणजे दुसऱ्या कोणाला मोठे होऊ द्यायचे नाही ही त्यांची वृत्ती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे सरकारमध्ये घुसून कोणी ? फोटले यांनीच. आम्ही एकत्र होतो मग युती का तोडली आम्ही हिंदुत्व सोडले, असा आरोप आमच्यावर होते. पाकिस्तानच्या खेळाडूंवर फुलांचा वर्षाव करता मग मी समाजवाद्यांसोबत आलो तर काय प्रॉब्लेम आहे ? आम्ही तुम्हाला गाढण्यासाठी एकत्र आलोय. हो...या समाजवाद्यांमध्ये मुस्लिम आहेत...भारतावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत. पाकिस्तानमध्ये जाऊन आम्ही प्रचार करत नाहीत, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपला झोडपले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT