Sandeep Deshpande, Uddhav Thackeray, Santosh Dhuri Sarkarnama
मुंबई

MNS On Shivsena Podcast: "मला घरी बसायला आवडते"; मोजकंच बोलून मनसेने मुलाखतीवरून ठाकरेंना सुनावले

Sandip Deshpande And Santosh Dhuri : संदिप देशपांडेंनी ठाकरेंचे वाभाडे तर संतोष धुरींनी लगावले टोले

सरकारनामा ब्यूरो

MNS On Aawaz Kunacha Podcast: टोलवरून दिवसभर भाजपवर तुटून पडलेल्या महाराष्ट्रव नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी वेळात वेळ काढून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचाही समाचार घेतला. ठाकरेंच्या मुलाखतीचा बुधवारी (ता. २६) पहिला भाग प्रसिद्ध झाला. मुलाखतीची स्फोटक आणि ज्वलंत अशी जाहिरात करूनही ठाकरे नवीन काहीच बोलले नसल्याची टीका शिंदे गट आणि मनसेकडून करण्यात आली. या मुलाखतीची नक्कल करीत व्हिडिओ तयार करून मनसेकडून ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. (Latest Political News)

मनसेच्या या डमी मुलाखतमध्ये संदिप देशपाडे यांनी उद्धव ठाकरे तर मुलाखतकार खासदार संजय राऊतांची भूमिका संतोष धुरी यांनी बजावली. यावेळी दोघांनीही मिळून ठाकरे आणि राऊत यांच्यावर खोचक टीका केली. तसेच ठाकरे सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्याचा प्रयत्नही दोघांनी केला आहे. यानंतर ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. याबाबत संदिप देशपांडेंनी 'व्हिडिओ' ट्विट केला आहे.

मुलाखतीच्या सुरुवातीस प्रश्न विचारताना धुरी यांनी ठाकरेंची अनोख्या पद्धतीने ओळख करून दिली. ठाकरे जगातील नंबर वन माजी मुख्यमंत्री असल्याचा टोला लगावला आहे. धुरी म्हणाले, "आज मी आणि फक्त मीच ज्यांची नेहमीच घेतो मुलाखत, तेच महाराष्ट्राचे नव्हे जगाचे एक नंबरचे माजी मुख्यमंत्री ज्यांची ओळख करून द्यायची गरजच नाही."

मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी केलेल्या कारभारावरही धुरींनी टीका केला. "कोरोना काळात घरात बसून सरकार चालवले. फेसबुकच्या माध्यमातून जे तुमच्या कुटुंबाचे सदस्य झाले. कोरोनाबरोबर आमची जायची तयारी आहे पण कोरोनाची आमच्याबरोबर राहायची तयारी आहे का, हे वाक्य ज्यांनी अजरामर केले तेच. महानगरपालिकेचे करोडो रुपये खर्च केले. हजरो कोटी खर्च करूनही खड्डे बुजवले नाहीत. रस्ते चांगले बनवले नाहीत," असे टोले धुरींनी यावेळी लगावले.

धुरींनी ओळख करून दिल्यांनी ठाकरेंच्या भूमिकेतील देशपांडेंनी मात्र ठाकरेंचे वस्त्रहरण करण्याची एकही संधी सोडली नाही. देशपांडे म्हणाले, संतोष मला घरी बसायला आवडते, किंबहुना खूपच आवडते. वडिलांना दिलेला शब्द, शिवसेनेचा मुख्यमंत्री, मर्दाची औलाद, मर्द, दिल्लीश्वर, अफजल खानाच्या फौजा, कोरोना, मास्क, सुरक्षित अंतर, कोमट पाणी, कपटी, मशाल आणि मी संकटात असलो की मराठी माणूस, थोडेथोडे हिंदुत्व, औरंगजेब, मिंदे गट, गद्दार, खंजीर, खोके.... मुलाखत संपली, किंबहुना संपलीच."

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत, सभांमध्ये वारंवार तेचतेच बोलत असल्याची टीका मनसेकडून केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून आता मनसेविरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे. या 'व्हिडिओ'ला ठाकरे गट काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT