Uddhav Thackeray during his exclusive interview with Sanjay Raut for Saamana, discussing the impact of EVM issues and internal MVA clashes on assembly results Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi : 'मविआ'ने लोकसभेला कमावलेलं विधानसभेला का गमावलं? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, "तू तू मै मै अन्..."

Uddhav Thackeray Interview : "सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आलं आहे."

Jagdish Patil

Mumbai News, 19 Jul : ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' या त्यांच्याच पक्षाच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. शिवसेनेचे अस्तित्व, दिल्लीतून ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी होणारे प्रयत्न आणि त्याला मिळालेली निवडणूक आयोगाची साथ यावर त्यांनी परखड भाष्य केलं आहे.

याचवेळी उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत पानीपत का झालं? याचं उत्तर देखील त्यांनी दिलं आहे. मुलाखतीदरम्यान, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारलं की, जे तुम्ही लोकसभेला कमावलंत, ते विधानसभेला गमावलंत. फक्त सहा महिन्यांत हे कसं घडलं?

या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आलं आहे. ‘लाडकी बहीण’सारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की, वाद थोडे कमी असतात.

निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाला की, स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ ‘आपल्याला जिंकायचंय’ म्हणून सोडून दिले. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. ‘तू तू मै मै’ झालं. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला.

लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसलं तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे. ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ राहत नाही, असं म्हणत ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत मविआतील अंतर्गत वाद कारणीभूत ठरल्याचं मान्य केलं.

शिवाय लोकसभेचं यश सगळ्यांच्या डोक्यात गेलं होतं. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो ‘मी’पणा आला तेव्हा पराभव आला. त्यात शेतकरी कर्जमाफी वगैरे तांत्रिक बाबी देखील होत्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT