Dada Bhuse On UBT  Sarkarnama
मुंबई

Dada Bhuse On UBT : 'दाऊदच्या हस्तकासोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी, हे जखमेवर मीठ...' ; मंत्री भुसे भडकले!

Dada Bhuse On Uddhav Thackeray : सलीम कुत्ता याचा माध्यमातून मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले होते.

Chetan Zadpe

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या सोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणेंच्या आरोपांना सुधाकर बडगुजर यांनी काही तासांतच प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर लगेचच बडगुजर यांची चौकशीही सुरु झाली. याबाबत आता सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी आता बडगुजर यांच्यावर आगपाखड केली आहे. (Latest Marathi News)

बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबत कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापले होते. याबाबत दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आणि देशद्रोही कृत्य असल्याचे म्हणाले. भुसे म्हणाले, '1993 मध्ये जे भयानक बॉम्बस्फोट झाले, यातला आरोपी दाऊद इब्राहिम याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आपलाही तो क्रमांक १ चा शत्रू आहे. त्याचा राईट हँड असलेल्या सलीम कुत्ता याचा माध्यमातून हे बॉम्बस्फोट घडवले होते. यामुळे कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अशा सलीम कुत्तासोबत उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर दिसतात, ही गंभीर गोष्ट आहे. जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. हे देशद्रोही कृत्य आहे,' असे मंत्री दादा भुसे म्हणाले.

सुधाकर बडगुजरांचे स्पष्टीकरण

'माझ्यावर सभागृहात ज आरोप झाले आहेत त्यावर त्यांनी योग्य माहिती घेतलेली नाही. 2016 मध्ये विजया रहाटकर यांची वेगळ्या विदर्भासाठी नाशिकमध्ये सभा झाली होता. ती सभा शिवसैनिकांनी आंदोलन करत उधळून लावली होती. त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये मीही 14-15 दिवस तुरुंगात होतो. अनेक शिवसैनिक माझ्यासोबत तुरुंगात होते. या 15 दिवसांच्या तुरुंगवासात आमच्यासोबत बॉम्बस्फोटाचे आरोपी नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात होते, हे माहिती नव्हते, असा खुलासा ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी केला होता.

राजकारणात येण्यापूर्वी माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नव्हता. जे काही गुन्हे दाखल झाले ते राजकीय हेतूने आणि आंदोलनांमुळे झालेत. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी आपले नाव जोडले गेले. त्याला 1992-93 मध्ये अटक झाली असेल ना. मात्र, 2016 मला अटक करून नाशिकच्या तुरुंगात ठेवले होते. तेव्हा तिथे तेही होते. यामुळे हा सगळा बेबनाव आहे. व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे,' असा दावा बडगुजर यांना केला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT