MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group|
MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group|  sarkarnama
मुंबई

Gajanan Kirtikar : शिंदे गटात गेल्यानंतर काही तासातच कीर्तिकरांची ठाकरे गटाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी

सरकारनामा ब्युरो

Gajanan Kirtikar : ठाकरे गटातील (Thackeray Group) ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर(Gajanan Kirtikar) यांनी काल (शुक्रवारी) शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी काल सांयकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थान भेट घेतली. रविंद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदमदेखील उपस्थित होते. (Gajanan Kirtikar latest news)

कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश करताच काही तासातच त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. याबाबत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पक्षाविरोधी कारवाया केल्याने पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कीर्तिकर यांची नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

गजानन कीर्तिकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री एक गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावेळी खासदार कीर्तिकर हे मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनाला गेले होते, तेव्हापासून ते शिंदे गटात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, आता पुन्हा चूक नको असा सल्ला कीर्तिकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता.

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी ही राजकीय भेट नसल्याचं म्हटलं होतं. ते आजारी असल्याने त्यांची भेट घेतल्याचं बोललं गेलं. पण आता कीर्तिकर यांनी स्वत: वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिंदे गटात प्रवेश केला.

शिंदे यांच्या गटात या आधीच शिवसेनेचे बारा खासदार गेले आहेत.आता कीर्तीकरांच्या जाण्यामुळे शिंदे गटाकडे खासदारांची संख्या तेरा झाली आहे. तर ठाकरे गटाकडे फक्त सहाच खासदार उरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT