Uddhav Thackeray  sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : धक्कादायक! उद्धव ठाकरेंचे नाव मतदारयादीतून काढण्याचा प्रयत्न; 'तो' अर्ज स्वतः वाचून दाखवला

Uddhav Thackeray Voter List Satyacha Morcha : सत्याचा मोर्चा मध्ये उद्धव ठाकरेंनी एक अर्ज वाचून दाखवला. त्या अर्जातून आपले आपले आणि आपले कुटुंबाचे नाव मतदारयादीतून काढण्याचा डाव असल्याचा आरोप केला.

Roshan More

Uddhav Thackeray News : महाविकास आघाडी आणि मनसेने आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढला. निवडणूक मतदारयादीतील दुबार नावे, खोटी नावे यावर मोर्चातून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या नावे खोटा अर्ज करून आपले नावच मतदारयादीतून काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी तो अर्जच सभेत वाचून दाखवला.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'सक्षम नावाच्या अ‍ॅपवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करण्यात आला. या अर्जामध्ये खोटा नंबर देखील दिला. यातून ओटीपी मिळवायाचा होता. कदाचित माझ्यासकट माझ्या कुटुंबाीतील चार जणांनी नांव बाद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नक्कीच यामध्ये काहीतरी डाव आहे.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'मी रितसर तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाची लोकं माझ्याकडे येऊन गेली. त्या अर्जाच्या खाली शेरा करण्यात आला आहे की, 'सदर अर्जाबाबात यांची भेट घेऊन पडताळणी केली असता सदर अर्ज आपण केला नाही, असा अभिप्राय मिळाला आहे. सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आला आहे.'

'मी एका पक्षाचा प्रमुख आहे. निवडणुकीत प्रचार करतो या गोष्टी आम्हाला कळत नाही का? याचा अर्थ याचं सर्व्हेर यांच्या ऑफीसमध्ये आहे. जयंत पाटील बोलले ते योग्य बोलले. विजय वड्डेटीवारांनी तर एकाच नाव घेतलं. पूर्ण यंत्रणा अ‍ॅप सकट यांच्या हातात आहे.', असा आरोप देखील नाव न घेता ठाकरेंनी भाजपवर केला.

न्यायालयात जाणार...

उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की मतचोर दिसला की तेथे फटकवला पाहिजे. महाराष्ट्रातील जनता सक्षम आहे. आम्ही पुरावे घेऊन न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयुक्त लाचार झाले आहेत. साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला न्याय मिळाल पाहिजे. तो न्यायालयात मिळेल. जनतेचे न्यायालय निर्णय घेण्यास सक्षम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT