uddhav thackeray devendra fadnavis sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : शिंदेंच्या बंडानंतर फडणवीसांना CM पदासाठी ऑफर दिली होती? उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackray On Bjp : "भाजपला जो करंट शिवसेनेनं दिला होता, तो त्यांचा करंटच काढल्यानंतर वॉशिंग मशीन काय चालणार?" असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Akshay Sabale

Mumbai News, 13 May : वर्ष 2022. जून महिन्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आमदारांसह बंड केलं. या बंडानंतर सूरत, गुवाहाटी, गोव्याचा मार्गानं जात पुन्हा महाराष्ट्रात येत एकनाथ शिंदे यांनी भाजप ( Bjp ) आणि शिवसेना( Shivsena ), अशी सत्ता स्थापन केली. पण, शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. पण, हा दावा उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

''जेव्हा शिंदे आणि (भाजप) आम्ही सोबत येत होतो. त्या दिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. ते मला म्हणाले, तु्म्ही मी कशाला त्यांना (बंडखोरांना) सोबत घेताय. त्यांना (एकनाथ शिंदे) कशाला पद देताय. मी संपूर्ण शिवसेना पक्ष घेऊन येतो, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती. उद्धव ठाकरेंनी यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली होती. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला. मग उद्धव ठाकरे बोलले. मात्र, मी त्यांना सांगितलं वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपल्याच मी ठाकरेंना सांगितलं. जे सोबत आले त्यांच्याशी मी बेईमानी करणार नाही, असे त्यांनी मी स्पष्ट सांगितलं," असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, "मी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी फोन केला, हे शक्यच नाही. या सगळ्या भाकड कथा आहेत. कारण, हे नासलेले आंबे मला माझ्या निष्ठावंतांच्या पेटीत ठेवायचे नव्हते. नाहीतर त्यांच्या शेपट्या धरून त्यांनाही मी पकडून ठेवू शकलो असतो. मात्र, असले पळणारे उंदीर माझ्या काय कामाचे?"

नरेंद्र मोदींच्या 'वॉशिंग मशीन'चा तुम्हाला कधी मोह पडलाय का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं, "भाजपला जो करंट शिवसेनेनं दिला होता, तो त्यांचा करंटच काढल्यानंतर वॉशिंग मशीन काय चालणार? आता त्यांच्यावर ही पाळी का आली? अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती तिला तुम्ही नकली शिवसेना म्हणताय. आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन त्यांना ‘बाळा जो जो रे’ का करताय तुम्ही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT