Uddhav Thackeray,  Sanjay Raut, Latest News
Uddhav Thackeray, Sanjay Raut, Latest News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : जे पक्षातून पळाले त्यांच्यासाठी हा धडा ; राऊतांच्या सुटकेनंतर ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut : जेलमधून जामिनावर बाहेर आलेले ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. मातोश्रीच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ येत आदित्य ठाकरे यांनी राऊतांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. (Sanjay Raut Latest News)

उद्धव ठाकरे म्हणाले, "संजय राऊत हे आमच्या कुटुंबातील आहे. ते जेलबाहेर आल्याचा आनंद आहे. संजय यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचा नेते , खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. त्याचबरोबरीनं जिवलग मित्र आहेत. संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. संकटात तो लढतोय. काल कोर्टाने निकाल दिला. न्यायदेवतेचे मी आभार मानतो,"

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला. ते म्हणाले, "केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. या यंत्रणा सुपारी घेऊन काम करीत असतील तर अशा यंत्रणा बंद केल्या पाहिजे. न्यायालय आपल्या बुडाच्या खाली घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न करीत आहेत. केंद्रीय यंत्रणेच्या दुरुपयोग करुन देशात पक्ष फोडले जात आहेत,"

न्यायालयाच्या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले," कर नाही त्याला डर कशाला, जे पक्षातून पळून गेले त्यांच्यासाठी हा धडा आहे,"

"शिवसेनेला मी आई मानतो. शिवसेनेसाठी १० वेळा जरी तुरुंगात जावे लागले, तरी मी जाईल. महाराष्ट्रात शिवसेना एकच आहे. गट वैगरे काही नाही.राज्य फडणवीस चालवतात, बाकीचे गुंडाळतात,"अशा शब्दात राऊतांनी शिंदेंना टोला हाणला. दोन दिवसानंतर पक्षासाठी काम करण्यासाठी पुन्हा सक्रिय होणार असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.

आदित्य ठाकरे उद्या भारत जोडो यात्रेत नांदेड येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेलाही राऊत यांची उपस्थिती असण्याची शक्यता व्यक्त होतेय. याबाबत राऊत यांना विचारले असता नेतृत्वाने सांगितले असता जाईन, असे उत्तर त्यांनी दिले.

ईडीने राऊतांना मनी लॉड्रिंगप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर एकशे दोन दिवस कोठडी घालवल्यानंतर राऊतांना काल (बुधवारी) जामीन मिळाला आहे. यामुळे ते पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आलेत. राऊतांच्या जामिनाला हरकत घेणाऱ्या ईडीच्या याचिकेवरही आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT