Deepak Kesarkar sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंनी वडिलकीच्या नात्याने त्यांना जवळ घ्यावे... दीपक केसरकर

माझ्यावर शिवसेनेच्या Shivsena ५० आमदारांनी MLA व एकनाथ शिंदेसाहेबांनी Eknath Shinde जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

Umesh Bambare-Patil

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख यांनी वडिलकीच्या नात्याने रागावून गेलेल्यांना जवळ घ्यावे. तसे घडले तर शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या लोकांना आनंद होईल, अशी अपेक्षा शिवसेनेचे शिंदेगटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मातोश्रीची दारे पुन्हा उघडी झाली तर घर वापसी होईल का, या प्रश्नावर व्यक्त केली.

शिवसेना शिंदे गट व भाजपचे सरकार बनविण्यात नेते दीपक केसरकर यांनी महत्वाची भूमिक निभावली होती. आता सरकार स्थापन झाल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया राहिल, या प्रश्नावर ते म्हणाले, आज अतिशय आनंद होत आहे. माझ्यावर शिवसेनेच्या ५० आमदारांनी व एकनाथ शिंदेसाहेबांनी जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

आता विकासाच्या नवीन दिशेने आपल्याला जायचे आहे. आज शिवसेनेचे ५० ही आमदार तुमच्याशी बोलण्यास तयार आहेत. त्यामुळे आता माझे काम उरलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न असला तरी 'मातोश्री'ची दारे पुन्हा उघडी झाली, तर घर वापसी होईल, असे वाटते का, या प्रश्नावर केसरकर म्हणाले, हा विचार उद्धव साहेबांनी करायला हवा आहे. मी करू शकत नाही.

त्यांचे केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध होते. त्यांनी एकदा हात घातले, मनाचा मोठेपणा दाखवला, तर घरातील मुले रागवून निघून जातात, त्यावेळी वडिलकीच्या नात्याने त्यांना जवळ घ्यावे लागते. तसे घडले तर शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या लोकांना आनंद होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT