Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi sarkarnama
मुंबई

नाराज आमदारांचा लेटरबॉम्ब अन् मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दणका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांना दणका दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. शिवसेना (Shivsena), अपक्ष आणि भाजपच्या (BJP) काही नाराज आमदारांनी निधीबाबत लिहीलेल्या तक्रार पत्रानंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेना आमदारांना डावलून त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी देतात, शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेत नाहीत. निधीवाटपामध्ये दुजाभाव करतात, अशा काही गंभीर तक्रारी शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन केली होती. या पत्रावर भाजप आणि काही अपक्ष अशा २० हुन अधिक आमदारांच्या सह्या आहेत.

या पत्रात विशेषतः आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी यांच्याबाबत आमदारांचा रोष दिसून आला. पाडवी यांनी २०० कोटींची ५०-५४ आणि ३०-५४ अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या कामांच्या निधीचे आणि आदिवासी योजनांच्या निधीचे आमदारांना न विचारताच वाटप केले असा आरोप या आमदारांनी केला आहे.

यापूर्वी देखील शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांबाबत तक्रार केली होती. मात्र आजच्या पत्रानंतर अशा सर्व कामांना स्थगिती देण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच अशा परस्पर दिलेल्या कामांची यादी तयार करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आहे.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझ्या कानावर ही गोष्ट आली. पण महाआघाडी झाली तेव्हाच सर्व स्थानिक आमदारांना निधीबाबत विश्वासात घेतले जाईल असे ठरले होते. शिवाय काही बाबतीत तक्रारी आल्यावर त्या बाहेर सांगितल्या जातात, त्यामुळे चर्चा जास्त होतात, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. आमच्याही आमदारांच्या तक्रारी येत असतात पण आम्ही त्यांना समजावून सांगतो. त्यामुळे आमच्या आमदारांच्या तक्रारी बाहेर येत नाही. इतरांच्या तक्रारी बाहेर येतात, असेही मत त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT