Uddhav Thackeray ff
Uddhav Thackeray ff Sarkarnama
मुंबई

`विकृत, विद्रूप, भेसूर भाजप भयानक पद्धतीने अंगावर येऊ लागला... हाच आपला मित्र होता का?`

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसंवाद यात्रेत जोरदार भाषण करत भाजपवर (BJP) शरसंधान केले. बांद्रा कुर्ला काॅम्प्लेक्स येथे झालेल्या विराट सभेत ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा पुकारा केला. आमची 25 वर्षे भाजपसोबत युतीत सडली, या वाक्याचा त्यांनी पुनरूच्चार करत किती भयानक पद्धतीने ते अंगावर येतात, यावर विश्वास बसत नाही. युती तुटल्यानंतर त्यांचा विद्रूप, भेसूर चेहरा दिसू लागला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. (Shivs sena targets BJP)

त्याच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

-आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.

-आमचे हिंदुत्व म्हणजे देवळात घंटा बडविणारे नाहीतर अतिरेक्यांना तुडविणारे आहे. ज्यांनी घंटा बुडविल्या त्यांना काय मिळालं घंटा? ज्यांना महाराष्ट्र काय आहे हे कळलं नाही त्यांच्यासाठी बोलावे लागत आहे.

- खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेले पक्ष आपल्या सोबत होता. तो देशाची दिशा बदलत आहे.

- एक मे रोजी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस हे चुकून खरे बोललो. मुंबई स्वतंत्र करणार, असल्याचे त्यांच्या मालकांचे म्हणणे असल्याचे ते बोलून गेले. पण तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी ती तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. जो कोणी या मुंबईला वेगळा करायचा प्रयत्न करेल त्याचे तुकडेतुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

-मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कोणी मागितली? मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? मुंबई काय पारतंत्र्यात आहे?

-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकदाही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हता. होता पण जनसंघ म्हणून होता. माझे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या पाच सेनापतींत होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, यासाठी लढणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीतून पहिल्यांदा बाहेर पडला तो जनसंघ. म्हणजे यांचे बाप! मुंबई स्वतंत्र करण्याचा त्यांचा तेव्हापासूनचा प्रयत्न आहे. फडणविसांनी एक मे रोजी घेतलेल्या सभेत ते पोटातले ओठावर आहे.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडवर बैठक घेतली. पण पंतप्रधानांनी महागाई कमी करण्याचा आम्हाला सल्ला दिला.

-ज्या ज्या वेळेला मुंबईवर आपत्ती येते त्या वेळी शिवसैनिक धावून येतो. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तो मदत करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT