Rahul Gandhi Sarkarnama
मुंबई

Rahul Gandhi @ Mumbai : राहुल गांधींच्या स्वागताला सावरकरांचे गीत; शिवसेना भवनसमोर नेमकं काय घडलं?

Bhatrat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेत 50 ते 100 तुतारीवादकांचा लक्षवेधी नाद

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राज्यात काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडला, अशी टीका भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून सतत केली जात आहे. मात्र आम्ही सावरकरांचे विचार सोडले नाहीत, हेच शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी दाखवून दिले. काँग्रेसची भारत जोडो यात्रा शिवसेन भवन येथे येताच सावरकर यांनी लिहिलेल्या 'जयोस्त्तुते श्रीमहन्मंगले' या गीताची धून वाजवण्यात आली. Rahul Gandhi @ Mumbai

काँग्रेसनेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत न्याय यात्रा देशभर फिरून द्वेषाविरोधात आवाज उठवत आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेचा रविवारी (ता. 17) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर समारोप होणार आहेत. त्यावेळी इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते रॅली काढून लोकसभा निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला ही यात्रा शिवसेना भवन येथे आली. त्यावेळी राहुल गांधींचे सावरकर यांच्या 'जयोस्त्तुते श्रीमहन्मंगले' या गीताची धून वाजवून स्वागत करण्यात आले. दरम्यान, राहुल यांनी सावरकरांवर टीका केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या यात्रेत तुतारीचीही चर्चा होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाला चिन्ह म्हणून तुतारी मिळालेली आहे. भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांच्या स्वागताला तुतारी नाद करण्यात आला. यावेळी 50 ते 100 तुतारीवादक उपस्थित होते. हा नाद मुंब्रा कौसा परिसरात नाहीतर संपूर्ण यात्रेत पाहण्यास मिळाला आहे.

या यात्रेचा शुभारंभापासून यात्रेदरम्यान मुंब्रा-कौसा येथून टीप टॉप हॉटेल्सपर्यंत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या माध्यमातून तुतारी नाद करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यात्रेदरम्यान दिवसभर झालेल्या तुतारी नादाने पुन्हा एकदा तुतारी चर्चेला आली आहे. याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या उमेदवारालाच होईल, असेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT