Uddhav Thackeray News  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंना इकडे आड तिकडे विहीर; आता मशाली'वरुन समता पक्ष आक्रमक

Samata Party On Thackeray Group Symbol: पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे तात्पुरतं निवडणूक चिन्ह देऊ केलं होतं.

सरकारनामा ब्युरो

Shivsena News: केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या समोरच्या अडचणी अजून वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे तात्पुरतं निवडणूक चिन्ह देऊ केलं होतं. पण आता ही मशाल चिन्हही अडचणीत आले आहे

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या आधी मशाल हे चिन्ह बिहारमधील समता पार्टीला दिलं होतं. आपल्या आता समता पार्टी आक्रमक झाली आहे. आमचं चिन्ह आम्हाला परत मिळावं, अशी मागणी समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी केली असून मंगळवारी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेटही घेतली.

एकनाथ शिंदेंशी झालेल्या भेटीनंतर उदय मंडल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘मशाल’ पक्षचिन्हासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे मंडल यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी पाठवलं होतं. ते त्यांनी कोणतं समीकरण जुळवण्यासाठी आदित्य याना बिहारला पाठवलं होतं? आदित्य ठाकरे जर महाराष्ट्रातून बिहारला जाऊ शकतात. तर बिहारहून समता पक्षाचे सदस्यही महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देऊ शकतात.” असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

निवडणूक आयोगासमोरील लढाईत सत्याचा विजय झाला आणि खोटेपणा हरला, असंही मंडल म्हणाले. “मशालची लढाई ही आमची स्वत:ची लढाई आहे. एकनाथ शिंदे यांना जे हवं होतं, ते त्यांना मिळालं. आता आम्हाला जे पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जाणार आहोत, असा इशाराही उदय मंडल यांनी दिला. हे सर्व पाहता आता ‘मशाल’ हे चिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातून जाणार का? असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT