Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

ठाकरेंचे ठरले; नऊ ऑक्टोबरला शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडधडणार तोफ

दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हे संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray : मुंबई : दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हे संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेचा पुढील प्लॅन ठरला आहे. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात 9 ऑक्टोबरला तोफ धडधडणार आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथे जाहीर सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या 'महाप्रबोधन' यात्रेला सुरुवात होणार आहे.

महाप्रबोधन यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे राज्यातील प्रमुख शहरात भाषण करण्याची शक्यता आहे. महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे. शिंदेंच्या होमग्राऊंडवर उद्धव ठाकरेंची ९ ऑक्टोबरला जाहीर सभा होणार, असल्याचे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या धक्यातून शिवसेनेला सावरण्यासाठी ठाकरे यांनी 'मातोश्री'वर बसून नियोजन करत प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिकांशी चर्चा केली. तसेच आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात निष्ठा यात्रा काढली होती. त्या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत.

शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांच्या मतदार संघात ठाकरेंनी अनेक नवीन चेहरे तसेच जुन्या नेत्यांना पुन्हा सक्रीय केले आहे. यात्रेमध्येही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या या यात्रेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT