CM Uddhav Thackeray news 
मुंबई

शिवसेनेची तोफ धडाडणार ! उद्धव ठाकरे जंगी सभा घेणार

CM Uddhav Thackeray news| मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चार महिन्यांतच राज्यभरात कोरोनाची टाळेबंदी लागली.

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray latest news

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवारी (14 मे) मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानात ही सभा होणार आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही पहिलीच खुल्या मैदानात अशा प्रकारची ही पहिलीच राजकीय सभा असणार आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चार महिन्यांतच राज्यभरात कोरोनाची टाळेबंदी लागली. त्यामुळे खुल्या मैदानात शिवसेनेचा दसरा मेळाव्यासह इतर राजकीय जाहीर सभा होऊ शकल्या नाहीत. निर्बंध शिथिल झाल्यानंतरही आजारपणामुळे त्यांनी ऑनलाइन किंवा सभागृहात राजकीय मेळावे घेतले. आता अडीच वर्षांच्या कालावधीनंतर शिवसेनेची ओळख असलेली खुल्या मैदानात राजकीय सभा प्रथमच होणार आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी या सभेची जंगी तयारीही सुरु केली आहे.

राज्यात हिंदुत्वावरून सुरू असलेले राजकारण आणि त्यात विरोधकांनी शिवसेनेची केलेली कोंडी, भाजप-मनसेच्या राजकीय खेळ, यांमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. पक्षाच्या खासदारांच्या आणि पक्ष प्रवक्त्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले होते. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे.

तर उद्याच्या सभेनंतर औरंगाबादेत ८ जून रोजी दुसरी सभा होणार आहे. औरंगाबादच्या सभेच्या घोषणेमुळे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे मानले जात आहे. ८ जून १९८५ रोजी मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा औरंगाबादेत स्थापन झाली. येत्या ८ जून रोजी या शाखेचा ३७ वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत येऊन जाहीर सभा घ्यावी अशी विनंती मी काही दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन केली असल्याचे शिवसेना चंद्रकांत खैरेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT