Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : भाजपच्या मिशन ४५ ला ठाकरे लगाम घालणार?

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी शिवसैना नेत्यांच्या बैठका घेत रणतीनी आखण्यास सुरुवात केली आहे

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रासाठी भाजपने मिशन ४५ सुरू राबवण्यास सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून त्यांनी बारामती, शिरुर, कल्याण डोंबिवली या मतदार संघाचा दौरा केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. त्यातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ४८ लोकसभा मतदार संघाच्या बैठका सुरू केल्या आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे.

दानवे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची लोकसभा निवडणुकीची रणनीती सांगितली. दानवे म्हणाले, 'शिवसेना (Shivsena) कोणत्याही लढ्याला तयार असते. उद्धव ठाकरे यांच्या ४८ लोकसभा मतदार संघाच्या बैठका सुरू झाल्या आहे. सर्व तालुका प्रमुख, आजी-माजी खासदार आमदार, जिल्हाप्रमुख, यांच्या बैठक घेतल्या जात आहेत.

संघटनात्मक बैठका होणार आहेत. प्रत्येक मतदार संघाचे वेगळे गणित आहे. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा देखली करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 'कॅगने पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांची सुद्धा चौकशी करावी, फक्त मुंबईची नाही, अशी मागणी दानवे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्या काळात नगरविकास मंत्री होते. त्यांच्या काळात कंत्राट देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री यांना अडचणीत आणण्यासाठी तर भाजप हे करत नाही ना?', असा सवाल दानवे यांनी केला. पोलीस सुरक्षा काढण्यावरून दानवे म्हणाले, 'मला वाटते शिवसैनिकांना कुठल्याही सुरक्षेची गरज नाही. त्यांना सुरक्षा कमी करू द्या. निवडणुकीला सुद्धा शिवसेना घाबरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT