Uddhav Thackeray, Ram Barot Latest News
Uddhav Thackeray, Ram Barot Latest News Sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; मुंबईच्या माजी उपमहापौरांच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर ४० आमदार, १२ खासदार आणि पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या गटात दाखल झाले आहे. यामुळे शिवसेनेमध्ये मोठे खिंडार पडलं असून त्यात भाजपनेही शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्ता राखणे मोठं आव्हान झालं आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते आणि माजी उपमहापौर डॉ. राम बारोट (Dr. Ram Borate) यांचा मुलगा निरव बारोट यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं आहे. यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Uddhav Thackeray, Ram Barot Latest News)

भाजपाचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट हे गेली ३० वर्षे भाजपाचे नगरसेवक होते. त्याचा मुलगा निरव बारोट यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनोद घोसाळकर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतून शिंदे गटात जाणारांची जणू स्पर्धाच लागली आहे. या पार्श्वभूमीवर बारोट यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश हा महत्वाचा मानला जात आहे. याआधी शिवसेनेतील पदाधिकारी हे शिंदे गट किंवा भाजपमध्ये जात होते. मात्र आता भाजपच्या महत्वाच्या नेत्याच्या मुलाने शिवबंधन बांधल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं? याबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोगामध्ये पोचला आहे. मात्र, ठाकरेंनी आद्यापही हार मानली नसून भाजप आणि शिंदे गटाचा ते सामना करत आहेत. आता या प्रवेशावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते. हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT