Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही; न्यायालयातील सुनावणीदरम्यान ठाकरेंची प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांच्या बाजूने ज्येष्ठ वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. मात्र, विजय आपलाच होणार, आई भवानीवर विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे यांनी विजयाची खात्री केली.

विजय आपलाच होणार, आई भवानीवर विश्वास आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उस्मानाबादहून आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी काही कार्यकर्त्यांना 'मातोश्री'वर नेऊन शिवबंधन बांधले. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.

आताचे वातावरण भारावून टाकणारे आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत, एक चांगली सुरुवात झाली. दुसरी केस न्यायालयात सुरू आहे. माझा आई भवानीवर व न्यायालयावर विश्वास आहे, असेही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

न्याय आपल्याला मिळणार आणि तो मिळालाच पाहिजे, तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणार आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचे, आहे कारण आमदार कैलास पाटील यांनी काय केले हे सर्वांना माहिती आहे. कैलासने काय पराक्रम केले ते तुम्हाला माहिती आहे. ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील बघितले. तुमच्या आधी जालनाचे लोक आले होते. तिथली परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाही. ज्या क्षणी मी वर्षा सोडून 'मातोश्री'त आलो तेव्हापासून असे शिवसैनिक येत आहेत. मला फोन येत आहेत कुठेही काही आपले वाकडे झालेले नाही, असे ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. भवानी मातेची कृपा आहे, ती कृपा नाही तर खरे कोण आणि चुकीचे कोण हे दाखवून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT