Uddhav Thackeray & Shrikant Shinde Latest News Sarkarnama
मुंबई

मध्यावधी निवडणुकांचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शिल्लक आमदारांना दिलेलं खेळणं...

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मध्यावधीच्या निवडणुकीचं भाकीत केलं आहे. त्यावर सत्ताधारी पक्षाकडून म्हणजे भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय, आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा मोठा गौप्यस्फोट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

तसेच मध्यावधी निवडणुकांचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, यासाठी सुरू केलेला टाईमपास असल्याची टीका त्यांनी ठाकरेंवर केली आहे. खासदार शिंदे हे रविवारी (ता. ६ नोव्हेंबर) डोंबिवलीच्या काटई गावात तुळशी विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray & Shrikant Shinde Latest News)

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार या ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलतांना श्रीकांत शिंदेंना म्हणाले की, महाराष्ट्राला सध्या अतिशय स्थिर आणि स्टेबल सरकार मिळालं आहे. त्यात शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं एक खेळणं त्यांच्या हाती दिलं जात असून हा निव्वळ टाईमपास सुरू असल्याचे म्हणत त्यांनी ठाकरेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

ते पुढे म्हणाले, ही वक्तव्य प्लॅनिंग करून केली जात आहेत. तसेच हे सरकार गेल्या ३ महिन्यात ज्या पद्धतीने लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतेय, ते पाहता २ वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत यांची काय परिस्थिती होईल? याचा विचार करून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हे मध्यावधी निवडणुकीचं भूत समोर आणलं जात आहे.

दरम्यान, तर काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात कोण कुठे जातंय आणि कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कळेलच, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. आमचा आकडा किती वाढतो, हे येणाऱ्या काळात कळेलच, सगळ्यांचे आमदार आमच्या संपर्कात असून सगळ्या गोष्टी आत्ताच सांगता येणार नाहीत. थोडा धीर धरा, सबर रखो.. असाही सुचक इशाराही श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT