Ulhas Bapat
Ulhas Bapat Sarkarnama
मुंबई

घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, शिवसेना अजून देखील उद्धव ठाकरेंचीच

सरकारनामा ब्युरो

मुंबई - शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी समोरीच चिंता वाढल्या आहेत. अशातच राज्यपालांची भुमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांची भूमिका यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी अभ्यासपूर्ण मत मांडले आहे. News on the political situation in Maharashtra

उल्हास बापट म्हणाले की, राज्यपाल हे केंद्राचे नौकर नसतात पण ते एका राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसारच राज्यपालांना काम करावे लागते हे घटनेत स्पष्ट आहे. फक्त काही निर्णयच ते घेऊ शकतात. राज्यघटनेचा अभ्यासक म्हणुन वाईट वाटते की, सध्या राज्यपाल पदाचा गैरवापर होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसारच वागावे लागते. सत्र बोलावणे आणि सत्र संपवणे हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना बोलूनच बोलवावे लागते. उद्या बोलावलेलं अधिवेशन घटनाबाह्य आहे, असे मत त्यांनी मांडले.

सर्वोच्च न्यायालयात आज काय निकाल येतो हे पाहण महत्वाचे आहे. शिवसेना अजुन देखील उध्दव ठाकरे यांनीच आहे. राज्यपालांची भूमिका संशयाच्या विळख्यात येणारं असेल तर दुर्दैव आहे. अशा घटनांतून राजकारणाचा विजय होत आहे तर घटनेची पायमल्ली होत आहे. राज्यपालांनी अनेकवेळा घटनेचे उल्लंघन केले आहे. उदाहरणच द्याचे झाले तर 12 आमदारांची निवड आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहटेचा शपथविधी ही उदाहरणे समर्पक ठरतील, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT