Ulhasnagar Mahapalika Election 2025 Sarkarnama
मुंबई

Ulhasnagar Congress: महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; लहान घरांना कर मुक्तीची घोषणा

Ulhasnagar Mahapalika Election 2025:जाहीरनाम्यात सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देण्यात आले असल्याचे दिसते. शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली आहेत. ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता करमाफी देणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

सरकारनामा ब्यूरो

महापालिका निवडणुका जाहीर होताच पक्षांनी मोर्चबांधणी केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीतही उल्हासनगर येथील काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने मैदानात उतरल्याचे चित्र आहे. जाहीरनाम्यातील लोकाभिमुख आश्वासने, उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि संभाव्य आघाडी यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

या जाहीरनाम्यात सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देण्यात आले असल्याचे दिसते. शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली आहेत. ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता करमाफी देणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

याशिवाय उल्हासनगर शहरातील नागरिकांना सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सध्या शहरात पाणीटंचाई आणि अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आधुनिक जलव्यवस्थापन योजना राबवण्यात येतील, असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

आरोग्य सुविधांच्या बाबतीतही काँग्रेसने ठोस भूमिका घेतली आहे. शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे, रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा वाढवणे आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राजकीय आघाडीच्या दृष्टीनेही काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या एकूण २० प्रभागांमध्ये काँग्रेस पक्ष सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा करून निवडणुकीत आघाडी करण्याची तयारीही काँग्रेसने दर्शवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उल्हासनगरच्या राजकारणात महाविकास आघाडीची एकत्रित ताकद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात काँग्रेस पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून,इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मुलाखतींच्या माध्यमातून सक्षम, संघटनात्मक बांधिलकी असलेले आणि जनतेशी थेट संपर्क असलेले उमेदवार निवडण्यावर काँग्रेस नेतृत्वाचा भर असल्याचे प्रभारी नवीन सिंह,जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT