MP of Eknath Shinde group
MP of Eknath Shinde group Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Meeting at Varsha: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा: शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एवढी राज्यमंत्रीपदं

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde Meeting With MP : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. असे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांनाही केंद्रात मंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी एकनाथ शिंदेंनी आज (24 मे) रात्री आठ वाजता शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर बैठक बोलवली आहे. (Union cabinet expansion discussion: Shiv Sena has one cabinet and so many ministerial posts)

निती आयोगाच्या बैठकीआधी राज्यातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. याचवेळेस सर्व खासदारांसोबत मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री पदासंदर्भात चर्चा देखील करणार आहेत. एक किंवा दोन केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद किंवा एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद आणि तीन केंद्रीय राज्यमंत्री पदाबाबत सर्व खासदारांसोबत मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. (Shinde-Fadanvis Cabinet Expansion)

तसेच उद्धव ठाकरे यांच्या लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावाही घेण्यात येणार आहे. ठाकरे गटाने मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदार संघाचा उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. विशेष बाब म्हणजे, ठाकरे गटाकडून मुंबईतील लोकसभा मतदार संघाची चाचपणी सुरु झाली आहे. यातही जे खासदार शिंदे गटात गेले आहेत त्यांच्या मतदार संघांची चाचणी प्रामुख्याने केली जात आहे.त्या दृष्टीने या मतदार संघात उमेदवारही निश्चित होऊ शकतात. (Loksabha Elections)

याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे देखील आज वर्षा निवासस्थानी खासदारांची बैठक घेणार आहेत. एकनाथ शिंदेदेखील मुंबईतील लोकसभानिहाय मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनेही स्थानिक परिस्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरीकडे भाजपनेही लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने मिशन ४८ ची सुरुवात केली आहे. भाजपही लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून उमेदवारांचीही चाचपणी सुरु केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT