<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari</p></div>

Nitin Gadkari

 
Sarkarnama
मुंबई

राजकारणात याचं उत्तर कधीच मिळणार नाही...! गडकरी असं का म्हणाले?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : महाराष्ट्रात अनेक वर्षांची भाजपची (BJP) साथ सोडत शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) आघाडी करत सत्ता मिळवली. त्यानंतर राजकारणात (Politics) कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, याचा प्रत्यय आला. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही त्याचा पुनर्रच्चार करताना मोठं विधान केलं आहे. निवडणूक आली की यामध्ये बदल होत असतात, या गडकरींच्या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गडकरी यांनी राज्यात अनेक योजनांचे उदघाटन केले. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांच्यावर भाजप टीका करत होती. पण आता त्यांच्यासोबत आघाडी केली आहे. भाजपला कोणती मजबूरी होती, असा प्रश्न गडकरी यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी म्हणाले, राजकारण कधीही आघाड्या होतात, तुटतात. सोबत येतात, सोडून जातात. हा राजकारणाचा एक भाग आहे. राजकारणात याचं उत्तर कधीच मिळणार नाही. इथे कुणीच कायमचा शत्रु नसतो किंवा कायमचा मित्र नसतो. निवडणूक आल्यानंतर त्यात बदल होतो. काँग्रेसमध्ये अमरिंदरसिंग यांना ज्याप्रकारे अपमानित केले. त्यामुळे ते भाजपसोबत आले आहेत. ही एक चांगली घडामोड आहे. त्यांच्या सहकार्यामुळे भाजप व अमरिंदरसिंग यांच्या आघाडीचे सरकार बनेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केलं.

तो एक अपघात होता

लखीमपूर खीरी प्रकरणावरून विरोधकांकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर बोलताना गडकरी यांनी ही घटना एक अपघात असल्याचं म्हटले आहे. हे अन्ययापूर्वक आहे. या घटनेविषयी विस्तृत्त माहिती समोर आली आहे. जाणीवपूर्वक कुणीही काही केलेले नाही. हा एक अपघात होता. याचे राजकारण कुणीही करू नये. याप्रसंगी सगळ्यांमध्ये प्रेमाची भावना कशी निर्माण होईल, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी काम करायला हवे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. पण ही घटना दुर्भाग्यपूर्ण आहे, असे गडकरी म्हणाले.

राहुल गांधीनी हिंदुत्वाचा अर्थ माहित नाही

राहुल गांधी यांच्या हिंदू व हिंदुत्वावाद्यांमधील फरकाच्या वक्तव्यावर बोलताना गडकरी म्हणाले, हिंदू व हिंदुत्वाचे अर्थ माहिती नाहीत. हिंदुव हे जगण्याचा एक मार्ग आहे. धर्माचा अर्थ कतर्व्यासोबत जोडलेला आहे. हिंदुत्व ही जीवन पध्दती आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणं, हा हिंदू धर्म आहे. राहुल गांधी हिंदूही नाहीत आणि त्यांना हिंदूत्व समजतही नाही. आता किमान त्यांना मत मिळवण्यासाठी तरी आपण हिंदू असल्याचे म्हणावे लागले. नाहीतर आजपर्यंत त्यांची वागणूक कशी होती, हा संपूर्ण जाणतो, असा टोला गडकरी यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT