मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणं, या मताचा मी नाही. पण सरकारने त्यांची समजूत काढायला हवी होती, असं दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सभा घेणारच, असा दावाही दानवे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे एक मे रोजी जाहीर सभा घेणार आहेत. त्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. याबाबत बोलताना दानवे म्हणाले, कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. जर सरकारच्या चुका कुणीतरी मांडत असेल आणि त्याला रोखले जात असेल, तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. राज ठाकरे सभा यांच्या सभेला परवानगी मिळो अथवा ना मिळो राज ठाकरे सभा घेणारच असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलताना दानवे यांनी राज्यात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या पोलिसांच्या विश्वासहर्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. मलाच नाही तर या राज्याला चिंता आहे की, महाराष्ट्र बिहार होतोय की काय? सत्ताधारी पक्षातील तीनही पक्ष पोलिसांना पुढे करून त्यांना बदनाम करत आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.
पुण्यात किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. पण हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला नाही. पोलखोल सभेवर हल्ला झाला. तिथेही कारवाई नाही. रवी राणा यांनी हनुमान चालिसाबाबत वक्तव्य केलं होतं. कुणाच्या घरासमोर जाऊन चालिसा म्हणावे, हे माझं मत नाही. सरकारपैकी कुणी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांच्या घराबाहेर शिवसैनिक थांबलेले असताना त्यांना बाजूला केले नाही. उलट त्यांनाच अटक केली. हे लाजिरवाणे आहे, अशी टीका दानवे यांनी केली.
किरीट सोमय्या राणा यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. सोमय्यांच्या चालकावरच गुन्हा दाखल केला. राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे. रवी राणांच्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरली नाही. किंवा राज ठाकरे यांच्या समर्थनार्थही भाजप रस्त्यावर उतरली नाही. हा मुद्दा हनुमान चालिसाचा आहे. त्याचं पठण करा, असं म्हणणं गुन्हा नाही. त्यावरून तुरूंगात टाकणे, आंदोलन करणे हे चुकीचे आहे, असं दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.