BMC Building
BMC Building sarkarnama
मुंबई

राज्यपालांची सही अन् शिवसेनेचा जीव भांड्यात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सदस्यसंख्या वाढीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रस्तावातील सर्व अडथळे दूर होवून वटहुकूम जारी झाल्याने शिवसेनेचा जीव भांड्यात पडला आहे. त्यामुळे आता महापालिकेत २३६ नगरसेवक असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी वटहुकूम काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे प्रलंबित होता. सोमवारी राज्यपालांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर नगरविकास विभागाने हा वटहुकूम जारी केला आहे.

राज्यातील नगरपालिका-महानगरपालिकांमधील नगरसेवकांची १७ टक्के जागा वाढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर दिवाळीपुर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई महापालिकेत ९ नगरसेवकांची वाढवण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील लोकसंख्या वाढल्यामुळे या जागा वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेची सध्याची संख्या २००१ च्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आली होती. २०११च्या जनगणनेनंतर सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आला नव्हता. त्यानंरत २०११च्या जनगणनेनुसार २००१ ते २०११ या एका दशकात मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली होती. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण लक्षात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या आता २२७ वरुन २३६ करण्यास मान्यता देण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT