Urfi Javed-Chitra Wagh Controversy News :
Urfi Javed-Chitra Wagh Controversy News : sarkarnama
मुंबई

Urfi Javed-Chitra Wagh Controversy : उर्फी जावेद-चित्रा वाघ वादाबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

सरकारानामा ब्युरो

Urfi Javed-Chitra Wagh Controversy : भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed)यांच्यातील कपड्यावरुन रंगलेला वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. दोघींमधील वाद महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या दरबारीही जाऊन पोहोचला आहे. या प्रकरणाची आता मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ टीका करीत आहेत. तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली होती.

त्यानंतर उर्फी जावेदने सातत्याने टि्वट करुन चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसं पत्र त्यांनी पोलिसांनाही दिलं होतं.चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे.

अंबोली पोलिस याप्रकरणाची चौकशी करणार आहे. उर्फी जावेद हीला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तिची आज चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंबोली पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक शैला कोराडे या उर्फीची चौकशी करणार आहेत, मुंबई पोलिस आयुक्तांनी याबाबतचा आदेश दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

महिला आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पण, या प्रकरणात कारवाई करण्यासाठी वेळ वाया घालवणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्पष्ट केली. यानंतरही चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यात कलगीतुरा सुरू आहे.काल (शुक्रवारी) उर्फी जावेद हिनेच महिला आयोगाकडे धाव घेत अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, "उर्फी जावेद हिला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता तिने सुरक्षेची मागणी केली आहे. ज्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जातोय त्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई व्हावी अशीही मागणी तिने महिला आयोगाकडे केली,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT